पाणी धरून ठेवणारे पॉलिमर्स

कमी पाणी असणाऱ्या प्रदेशात, अवर्षण भागात बऱ्याच वेळा पाण्याची कमतरता भासू लागली तर काही पॉलिमर्स उत्पादनांची शिफारस हे काही दुकानदार अथवा कंपनी कडून केली जाते. अशा वेळी एखादे पॉलिमर कसे पाणी शोषून घेते, याचे डेमो दाखवले जातात. पण असे उत्पादने वापरण्याआधी, खालील लेखात सांगितलेला अनुभव आपण हे प्रॉडक्ट वापरावे कि नाही याविषयी निर्णय घेण्यास आपल्याला मदत करतील.

कृषी विषयक ब्लॉग्स

श्री सुशांत हिरालाल सुर्वे

4/20/20231 min read

ड्रिपखाली टाकण्यासाठी, पॉलिमर्स उत्पादनांची शिफारस कधी कधी केली जाते. असे पॉलिमर टाकले तर पाणी कमी लागते, मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, मुळी चांगली चालते असे फायदे सांगितले जातात. अनेकवेळा गावात एखाद्या ठिकाणी, किंवा कृषी सेवा केंद्र धारकांना एखाद्या मिटिंग मध्ये असे डेमो दाखवले जातात. पातेलेभर पाणी, ते थोडे पॉलिमर चटकन शोषून घेते. झाडाच्या गरजेनुसार ते परत पुरवते असे फायदे सांगितले जातात. असे डेमो बघितल्यानंतर आपण देखील असे प्रॉडक्ट आपल्याला खूप फायदेशीर राहतील म्हणून घेतो. पण असे प्रॉडक्ट वापरण्याआधी मला आलेला अनुभव नक्की वाचावा.

मी माझा स्वतःचा यातील अनुभव सांगतो, आमच्याकडे तसे बारमाही पाणी कमीच असते..अशात एक दुकानात बसलो असताना कंपनी प्रतिनिधी कडून मी एक प्रॉडक्ट बद्दल ऐकलं कि जे ड्रीप खाली टाकलं कि पाणी धरून ठेवते. त्यांना वॉटर ऍबसॉर्बन्ट पॉलिमर म्हणतात..!

त्यांनी एक साधारण 5 ग्राम ते पॉलिमर घेतले आणि अर्धा लिटर पाणी त्यात ओतले..त्या 5 ग्राम ने जवळपास ते सर्व पाणी शोषून घेतले....

हे असलं तंत्रज्ञान खरच पाणी कमी असताना मला फायदेशीर वाटलं..मी लगेचच 1 किलो पॉलिमर घेतले बहुदा ते दीड दोन हजाराचे होते..!!

पॉलिमर घेऊन आल्यानंतर आमची शेती बघणाऱ्या सर्वांना दाखविण्यासाठी त्यांनी जसा डेमो केला तसा मी सर्वांसमोर 5 ग्राम पॉलिमर एका भांड्यात टाकले. आमच्या बंधूनी अर्धा लिटर पाणी त्यात टाकले..पाणी इंचभर पण जागेवरून हलले नाही..मी अजून काही पॉलिमर त्यात टाकले तरीही पॉलिमर पाणी शोषण्याचे काही मनावर घेईना, मी अजून पॉलिमर टाकले पाण्याला काहीच फरक पडेना..जे दुकानात 5 ग्राम मध्ये अर्धा एक लिटर पाणी शोषून घेतले ते मी घरी जवळपास 20 ग्राम टाकून पण रिझल्ट येईना..!!

मग झाले काय असावे..??

मी लगेच कंपनी प्रतिनिधिला फोन लावला व ताबडतोब घरी बोलावले..त्यांना प्रयोग दाखवला..त्यांनी परत एक भांडे घ्यायाला लावले परत 5 ग्राम औषध टाकले व त्यांच्या जवळील बाटलीतील पाणी भांड्यात टाकले आणि 5 ग्राम ने परत सर्व 1 लिटर पाणी शोषून घेतले..!!!

मित्रहो इथे झालं काय तर आमचे पाणी पॉलिमर ने शोषले नाही कारण आमच्या पाण्यचा pH सामू हा 8 चा वर आहे व टीडीएस जवळपास 1500 च्या वर असेल, आणि कंपनी प्रतिनिधीने जो प्रयोग करून दाखवला तो बिसलेरी च्या बाटलीतल्या पाण्यात करून दाखवला होता कि ज्यात सगळ्या गोष्टी एकदम प्रमाणात राहतात.

मी लगेच त्यांना सांगितलं तुमचा प्रॉडक्ट चांगला आहे पण मला शेताला बिसलेरी च पाणी सोडायला परवडणार नाही व मी तो प्रॉडक्ट परत केला..!

सांगायचा मतितार्थ एवढा मित्रहो कि, अनेकवेळा पाण्याची दाहकता काही प्रदेशात जाणवते, अशा वेळी असे प्रॉडक्ट बाजारात येतच असतात, त्यांची किंमत देखील महाग असते.

मी असे प्रॉडक्ट वापरू नका अस म्हणणार नाही, " पण गावात चौकात डेअरीवर किंवा मंदीरात असा प्रयोग झाला.आपल्याला औषधाने पाणीही शोषलेले दिसले तरीही आपल्या विहरीच्या-शेततळ्याच्या-बोअर च्या पाण्यात त्याची टेस्टिंग घ्या, आपले पाणी पण औषध धरून ठेवते कि नाही ते पण बघा. नाहीतर गावात प्रयोग पहिला औषध आणलं आणि डायरेक्ट वापरलं, पण औषध पाणी धरून ठेवत कि नाही हेच कळत नाही असं नको व्हायाला..!

हे असे नवीन तंत्रज्ञान आहेत पण त्यांना देखील मर्यादा आहेत. आपल्याला योग्य रिझल्ट्स मिळत असतील तर ठीक आहे पण जर अत्यंत गरज नसेल तर आपण मागे आपल्या काही लेखांत कमी पाण्याच्या भागातील ड्रीप पद्धतीचा, सेंद्रिय मल्चिंग चा वापर करून देखील पाणीबचत चांगल्याप्रकारे करू शकता.

धन्यवाद.

श्री सुशांत हिरालाल सुर्वे.

डाळिंबशेती मार्गदर्शक

संगमनेर

Bright living room with modern inventory
Bright living room with modern inventory