Follow us

pomegranate farmers meet at Sangali
pomegranate farmers meet at Sangali

सर्वप्रथम

अचूक शेती सल्ला

डाळिंब शेती आणि इतर कृषी पद्धतींबद्दल तज्ञ सल्ला देण्यासाठी सुशांत सुर्वे तुम्हाला येथे उपलब्ध आहेत. अनेक वर्षांचा अनुभव आणि प्रत्येक शेतकऱ्याने कमी खर्चात अधिक उत्पन्न काढून यशस्वी व्हावे यासाठी पावलोपावली योग्य ते मार्गदर्शन देण्यासाठी श्री सुशांत सुर्वे नेहमीच तत्पर आहेत. योग्य अशा शेतीविषयक मार्गदर्शनसाठी हजारो शेतकऱ्यांसाठी श्री सुशांत सुर्वे हे एक विश्वासू नाव आहे.

हे हि महत्वाचे

शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसाय, कल्पनांचे मार्गदर्शन

सुशांत सुर्वे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय-उद्योग, नवीन कल्पना यांवर ब्लॉग्स लिहितात. शेतकरी समूह, कृषिविश्वाला ते उपयुक्त माहिती, नवीन कल्पना तसेच कृषी विश्वातील नवीन घडामोडी, संकल्पना यांच्याविषयी मौल्यवान माहिती प्रदान करतात. व्यवसाय मधील नवीन ट्रेंडपासून ते सर्वोत्कृष्ट पद्धतींपर्यंत, माहिती मिळवू पाहणाऱ्या प्रत्येकाने त्यांचे ब्लॉग वाचलेच पाहिजेत.

हा उल्लेख ही गरजेचा

बाजारभाव व शेती समस्यांचे अचूक उत्तर

कृषीमधील मूळ समस्या समजून घेणे आणि त्यावर संभाव्य आणि प्रतिबंधात्मक उपाय शोधून त्या उपायांवर लक्ष केंद्रित ठेवणे हे श्री सुशांत सुर्वे यांना उत्कृष्ट जमते. शेती आणि व्यवसायातील त्यांचे कौशल्य त्यांना शेतकर्‍यांसाठी त्यांच्या समस्यांवर व्यावहारिक उपाय शोधणारे एकमेव व्यक्ती बनवते.

श्री सुशांत सुर्वे यांच्याविषयी

Sushant Surve is a Pomegranate Farming Advisor and a passionate writer. He combines his expertise in agriculture with his love for writing to provide farmers with valuable resources to improve their yield and profitability. His focus is on finding root problems and providing practical solutions to help the farming community.

श्री सुशांत सुर्वे हे एक डाळिंबशेती मार्गदर्शक आहेत. डाळिंब शेती मार्गदर्शन सोबतच, कृषीविषयक, व्यवसायविषयक ब्लॉग्स ते लिहत असतात. सुशांत सुर्वे यांचे लिखाण खूप प्रॅक्टिकल आणि प्रासंगिक वाटते. खासकरून, अलिकडील दीड-दोन वर्षांतील त्यांचे लिखाण व त्यातील संदर्भ हे ग्राऊंड लेव्हलवर असणाऱ्या संपर्काची साक्ष देतात. ते मुळचे इंजिनिअर असून, कृषी डिप्लोमा केला आहे.

शेतीसंदर्भात एक तर खूप भावनिक किंवा खूप पुस्तकी लिहिण्याची प्रथा आजही सुरू आहे.अशा वेळी सुशांत यांच्यासारखे नवे लेखक शेतकऱ्यांना गरजेचे आहे, तेव्हढे लिहितात. बदलते पाऊसमान, बदलता पीक पॅटर्न, व्यापारी पिकांचे बदलते अर्थकारण, मागणी-पुरवठा-व्यापाराचे बदलते रंग याबाबत सातत्याने सुशांत सुर्वे लिहित आहेत.

मुळ समस्या समजून घेणे आणि संभाव्य सोल्यूशन + प्रतिबंधात्मक उपायावर फोकस ठेवणे हे सुशांत यांना चांगले जमते. एखादे घर अडचणीत आल्यावर कारभारी जसा वाट काढण्याचा प्रयत्न करतो, तशीच लाईन सुशांत यांच्या लिखाणामध्ये दिसते. जी आजच्या एकूणच अडचणीतील शेतकरी समाजासाठी उपयुक्त वाटते.

सुशांत हे व्यवसायाने सल्लागार आहेत. सल्लागारांविषयी लिहिणे अवघड असते. पण, सुशांत यांचा व्यवसाय आणि लिखाण या दोन गोष्टी वेगळ्या वाटल्या. शेतकऱ्यांसाठी जे उपयुक्त आणि अनुभवसिद्ध आहे, अशा जाहिरातवजा नोंदी, तपशील, संदर्भ त्यांच्या लिखाणात दिसतात.

शुभेच्छा.

- Deepak Chavan, वरिष्ठ कृषी पत्रकार

Helping Farmers Grow

Get In Touch